Pune

…अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत – चंद्रकांत पाटील

By PCB Author

December 20, 2020

पुणे,दि.२०(पीसीबी) – शिवसेनेनं निवडणुकीआधी १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं अश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो. अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला. पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन समारंभात पाटील बोलत होते.

निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. जनतेला दिलेल्या अश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील. असा सल्लाही भाजपा त्यांनी नगरसेवकांना दिला.