Maharashtra

अशा अनेक नोटीसा आल्या, माझा नवरा घाबरणार नाही – शर्मिला ठाकरे

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – ईडी, सीबीआय ची आम्हाला सवय आहे.  नोटीसा पाठवून दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण, माझा नवरा घाबरणारा नाही, ही दबावतंत्राची  पध्दत आहे, अशा आम्हाला अनेक नोटीसा आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.  

कोहिनूर मिल विक्रीप्रकरण आणि या व्यवहारातून आम्ही २००८ मध्येच बाहेर पडलो आहे. याबाबतच्या सर्व कागदपत्रे  त्यांना देऊ.  आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माझ्या नवऱ्याला बिझी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.  राज ठाकरे  चौकशीला  बोलावले तर  नक्की जाणार,  असे सांगून माझा नवरा घाबरणारा नाही, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे. ज्या पद्धतीने भाजप विरोधकांवर तुटून पडले आहे, त्यावरून ते सूडाचे राजकारण करत असल्याचे सिध्द होत आहेत.  आमच्यावर सरकारचे खूप प्रेम आहे. ईडी, सीबीआय ची आम्हाला सवय आहे.  दबावात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे,  असे शर्मिला  ठाकरे म्हणाल्या .

दरम्यान, कोहिनूर मिलप्रकरणी  ईडीने राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांना नोटीस बजावली आहे.  यावरून विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.