अवैध धंद्यांविरोधातील कारवाईसाठी ‘अपना वतन’च्या वतीने शनिवारी पिंपरीत उपोषण

654

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  अवैध धंद्यांना जबाबदार धरून त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ‘अपना वतन संघटने’च्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात शनिवारी (दि.१७) लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

संघटनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून अवैध धंद्यांबाबत  ठोस भूमिका घेतली जात नसल्याने उषोषण करण्याचा निर्णय घेल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरामध्ये  गाड्यांच्या तोडफोड, खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, खंडणी वसूल करणे, महिलांवरील अत्याचार, तरूणींची छेडछाड अशा अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. त्यामुळे उपोषण करण्यात येणार असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.