Notifications

‘अवनी’ वाघिणीला गोळी घालून ठार मारणे बेकायदेशीर; चौकशी समितीचा अहवाल सादर  

By PCB Author

December 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – ‘अवनी’ वाघिणीला गोळी घालून ठार मारणे, हे बेकायदेशीर होते,  असे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या समितीने आपला अहवाल सादर केला  असून यात  अवनीला ठार मारण्यावरून असगर अली खान आणि वन कर्मचारी मुखबिर शेख यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.