अवनी, आम्हाला माफ कर तुला भेकडासारखे मारले; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्ला  

0
872

मुंबई, दि.५ (पीसीबी) – अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेनेही अवनीवरून भाजपविरोधात डरकाळी फोडली आहे. ‘ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. 

‘दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.