Maharashtra

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईत वाढ व्हावी

By PCB Author

February 29, 2020

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – विधानसभेत पुरवणी मागण्यांवर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले‘ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सध्या एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. याद्वारे त्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य नाही. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी,’ असे ते म्हणाले.

पुढे पाटिल म्हणाले, ‘अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मर्यादा देखील वाढवावी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची सरकारच्यावतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास तातडीने सुरुवात करावी,’ तसेच यंदा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अपाघातामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबीयांना आपण चार लाखाची नुकसानभरपाई देतो, त्यामध्येही वाढ करण्यात यावी आणि यामध्ये विम्याचा समावेश करण्यात यावा. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.