अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून गैरवर्तन

0
189

चाकण, दि. २२ (पीसीबी) – अल्पवयीन मुलगी मेडिकल मधून औषधे आण्यासाठी गेली असता तिला रस्त्यात अडवून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच ‘तुझ्या वडिलांना पैसे दयायला सांग नाहीतर तुझे काही खरे नाही’ अशी मुलीला आरोपीने धमकी दिली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री मेदनकरवाडी येथे घडली.

नानासाहेब शिवराज गांधीले (रा. काडाचीवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 27 वर्षीय आईने मंगळवारी (दि. 21) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी मेडिकल मधून औषधे आणण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास जात होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आला. त्याने मुलीला अडवून ‘तुझ्या वडिलांना पैसे दयायला सांग. नाहीतर तुझे काही खरे नाही’ अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ‘जर हे तू कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन’ अशा धमकी देखील आरोपीने दिली. यापूर्वी देखील आरोपीने मुलीला धमकावले होते.

17 सप्टेंबर रोजी दुपारी फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपी दुचाकीवरून आले. त्याने फिर्यादी यांना अडवले. ‘बांधकामाचे राहिलेले पैसे तुझ्या नव-याला दयायला सांग. नाहीतर तुझ्यावर बलात्कार करीन. तुझ्या मुलांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.