Others

अल्पवयीन मुलीच्या छातीवर रक्ताने लिहिलेले स्वतःचे नाव; बलात्कार करून अश्लिल व्हिडिओ बनवला

By PCB Author

March 20, 2023

कानपुर, दि.२० (पीसीबी ) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्रीचे नाटक करून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीच्या छातीवर ब्लेडने त्याचे नावही लिहिले. तक्रारीनंतर 24 दिवसांत पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी केली.