Pune Gramin

अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

By PCB Author

May 21, 2022

चाकण, दि. २१ (पीसीबी) – एका व्यक्तीने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरून एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. याप्रकरणी सोशल मिडिया अकाउंट धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2021 रोजी सकाळी पावणे सात वाजता निघोजे येथे घडला.

राहुल आलम (रा. निघोजे, ता खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी चाकण पोलीस ठायात शुक्रवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरून 1 जुलै 2021 रोजी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा आणि एक अल्पवयीन मुलगी यांचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. हा प्रकार संबंधित यंत्रणांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यांनतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.