Maharashtra

अर्धवट सावरकर घेऊ नका, पूर्णपणे घ्या – उद्धव ठाकरे

By PCB Author

December 17, 2019

नागपूर,दि. १७(पीसीबी) – सत्तेसाठी शिवसेना लाचारी पत्करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. फडणवीस यांच्या आरोपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं

सोमवारी सभागृहात जो प्रकार पाहिला आहे. त्यातून आम्हाला काही शिकविण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला सावरकरांबद्दल प्रेम आहे आणि ते कायम राहणार आहे. आम्हाला शिकवण्याची गरज नाही. अर्धवट सावरकर घेऊ नका, पूर्णपणे घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.