अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी पासून सूरू

0
355

मुंबई, दि.११ (पीसीबी) –  या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे आर्थिक वर्ष २०२०- २१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार (ता.२४) पासून सुरू होणार आहे. अशी माहिती परब यांनी दिली.

यावेळी बोलताना परब म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्‍चित केला असून यात १८ दिवस कामकाज होणार आहे. गुरुवार (ता.६) आर्थिक वर्ष २०२० – २१ या वर्षात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तर (ता.२४) आर्थिक २०१९ – २० च्या पुरवणी मागण्या तसेच आर्थिक वर्ष २०१४-२०१५, २०१५- १६, आणि २०१६ – १७ या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील.

अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.