Desh

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; कंपनी करात कपात

By PCB Author

September 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवारी) कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयाचे शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आले. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक ९०० अंकांनी उसळल्याचे पहायला मिळाले. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कपातीनंतर कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे.

यापूर्वी अर्थसंकल्पात कंपनी कराची किमान मात्रा असलेल्या २५ टक्के कर टप्प्यात आणखी काही कंपन्या समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यानुसार आता देशभरातील तब्बल ९९.३टक्के कंपन्या किमान अशा २५ टक्के कंपनी कर टप्प्यात येणार असून अवघ्या ०.७ टक्के कंपन्या या सर्वोच्च अशा ३० टक्के करांमध्ये कायम राहणार असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी २५० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या आस्थापनांना २५ टक्के कर लागू होती. त्यानंतर ही करमात्रा वाढवून वार्षिक ४०० कोटी उलाढाल असणाऱ्यांनाही लागू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.