Banner News

अर्णब गोस्वामी आता मुंबई पोलिसांच्या कचाट्यात – ५०० पानांच्या व्हाटसअप चॅटमध्ये भाजपा नेते आणि बड्या मंत्र्यांचे संबंध उघड

By PCB Author

January 15, 2021

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – अर्णब गोस्वामी आणखी गोत्यात पुछता है भारत, सांगत आरडाओरडा करणारा रिपब्लिक टिव्हीचा संपादक आता मुंबई पोलिसांच्या जाळ्यात पुरता सापडला आहे. ५०० पानांच्या व्हाट्सअप चॅटमधून अर्णब गोस्वामीचा टिआरपी घोटाळ्यातील समावेश पुरता उघड पडला आहे. भाजपमधील नेते आणि मंत्र्यांचे संबंध देखील उघड झाले आहे.

कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच अर्णब गोस्वामींचा उल्लेख केल्यानंत सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. टिआरपी घोटाळ्यातील आरोपी पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच त्यांच्या रिमांड कॉपीमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या नावाचा उल्लेख केला होता. कथित टीआरपीप्रकरणी मागील महीन्यात २५ डिसेंबर रोजी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची मदत घेण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वी बार्क चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना देखील अटक करण्यात आली होती. बार्क ही टीआरपी अधिकृतरित्या मॉनिटर करणारी संस्था आहे.

संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य निर्णय घेतला जाईल: शरद पवार या संस्थेनं लोकांच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावण्याची जबाबदारी हंसा रिसर्च एजन्सीला दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितलं की पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी जुने मित्र आहेत. पार्थो दासगुप्ता यांनी अर्णबला मदत केली आहे. ते अर्णबच्या सांगण्यावर टीआरपी मॅनेज करायचे. आता व्हाट्सअप चॅटमधून हे सर्व संभाषण आणि आर्थिक व्यवहार पुरते उघड झाले आहेत. केंद्रामधे मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्यापूर्वी केंद्रीय माहीती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांची नेमणुक तसेच पार्थो दासगुप्ता यांना संकटातून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करु असेही संभाषण आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्वच सदस्य आपले असल्याचेही एका संभाषणात आहे.

पोलिसांना पार्थो दासगुप्ता यांच्याकडून Tag- Heuer कंपनीचे घड्याळ (किंमत 1 लाख रुपये), कानातील चांदीच्या 62 रिंग, 59 बांगड्या, चंदेरी रंगाचे 12 नेकलेस, 6 अंगठ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये नोंद करण्यात आल्याप्रमाणे आरोपी पार्थो दासगुप्ताने रिपब्लिक इंग्लिश आणि हिंदी या वाहिनीच्या टीआरपीमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य संबंधित आरोपींशी संगनमत करुन बेकायदेशीर मार्गाने फेरफार केली आणि त्यांचा टीआरपी वाढवला. त्या बदल्यात अर्णब गोस्वामी यानी आरोपी पार्थो दासगुप्ता यास वेळोवेळी लाखो रुपये दिल्याचं निष्पन्न झालं आहे. न्यायालयात मुंबई पोलिसांनी सादर केलेली रिमांड कॉपी आणि सुधारीत चार्जशीट याच संभाषणावर आधारीत असल्यानं आता अर्णब गोस्वामीच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बार्क म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला याआधीच अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईडीने सुद्धा या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.