अरुण जेटली जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले – अमित शहा

0
407

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले अरुण जेटली यांच्या निधनामुळे माझं वैयक्तिक नुकसान झाले आहे असे अमित शाह म्हणाले.

तसेच पीएम मोदी यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, की अरुण जेटली यांच्या निधनाने मी सच्चा मित्र गमावला आहे. ज्यांना मी दशकांपासून ओळखत होतो याचा मला अभिमान होता. त्यांची आकलन क्षमता जेवढी होती त्या तोडीचा खूपच कमी लोक आहेत. ते आनंदात जगले. ते अनेक आनंदाचे क्षण पाठिमागे ठेवून गेले आहेत. आम्हाला त्यांची सदैव आठवण येत राहिल.