Maharashtra

अरुण जेटली उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे नेते – राज ठाकरे

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जेटली यांना आदरांजली अर्पण केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे श्री. अरुण जेटली ह्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. #ArunJaitley

— Raj Thackeray (@RajThackeray) August 24, 2019

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे अरुण जेटली ह्यांचं निधन झाले. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

.