अरुण जेटलींच्या जाण्याने शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली – उद्धव ठाकरे

0
390

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली (६६) यांचे एम्समध्ये निधन झाले. जेटली यांना ९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते . मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली .

अरुण जेटली यांचे निधन देशाला धक्का आहेच. पण शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवणारा महत्त्वाचा खांब कोसळला आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि अरुण जेटली यांच्यात सलोख्याचे संबंध होते. भाजप शिवसेना युती कायम राहावी आणि ती टिकावी असे अरुण जेटली नेहमी म्हणत असत, अशा आठवणींना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उजाळा दिला.