अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकली

0
441

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर  मंत्रालयात  धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. तसेच यावेळी त्यांच्यावर मिरचीपूडदेखील  फेकण्यात आली.  दरम्यान, केजरीवाल सुरक्षित असून त्यांचा चष्मा  तुटला आहे, असे सांगण्यात आले आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर  एक अज्ञात व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड टाकली. ज्यावेळी केजरीवाल त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना धक्काबुक्की करत त्याने मिरची पूड फेकली. केजरीवाल यांच्या डोळ्यात पूड गेल्याचेही सांगितले जात आहे.

अनिल कुमार  हिंदूस्ताने असे मिरची पूड टाकणाऱ्या व्यक्तीचे नांव आहे. त्याला सुरक्षारक्षकांनी अटक केली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या याआधीही शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.