Desh

अरविंद केजरीवालांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तरूणाला अटक  

By PCB Author

November 27, 2018

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकल्याची घटना ताजी असताना केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने आलेल्या एका तरूणाला आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे.   

आज केजरीवालांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान तरूणाला  अटक करण्यात आली असून पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.

मोहम्मद इमरान (वय ३९) असे अटक  करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.  त्याच्या खिशात पिस्तुलची  गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न  उभा राहिला  आहे.