अरबी समुद्रातील स्पीडबोटीचा अपघात की घातपात ? – अशोक चव्हाण

0
580

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या  स्पीडबोटीला झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. दरम्यान, हा अपघात आहे की? घातपात असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना स्पीड बोटीला झालेला अपघात चिंताजनक आहे. स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहे. मात्र, अचानक स्मारकाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्याने स्मारकाच्या कामाला गती दिली जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बुधवारी सरकारकडे स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत होत असलेल्या अनियमितते विरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी केलेले आरोप  अत्यंत  गंभीर होते. त्यामुळे मेटेंचे आरोप आणि दुर्घटना याचा काही संबंध आहे का? अशी शंका अशोक चव्हाण यांनी उपस्थित केली आहे.