अरबी समुद्रातील स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
1005

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – अरबी समुदात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेल्या स्पीट बोटींपैकी एक बोट खडकावर आदळल्याने बुडाली. या बोटीतील २४ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एकजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

मोठी दुर्घटना घडू शकली असती, पण वेळेवर इतर बोटी मदतीसाठी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर बेपत्ता असलेल्या सिध्देश पवार याचा शोध सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गिरगांव चौपाटीजवळ शिवस्मारकाच्या पायाभरणीचा आज (बुधवार) कार्यक्रम होणार होता. मात्र, त्यासाठी समुद्रात २५ जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट खडकावर जाऊन आदळली. त्यानंतर बोट समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये प्रधान सचिव, पदाधिकारी, अधिकारी होते. पाण्यात पडल्यानंतर त्यांना तत्काळ सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.