अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन देण्यात यावी – रामदास आठवले

0
571

मुंबई,दि.२१(पीसीबी) – आम्हाला अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन देण्यात यावी आमच्या या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत जमीन घेणार आहोत. त्या जमिनीवर बुद्ध मंदिर उभारणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आम्हाला मंदिर उभारणीरासाठी अयोद्धेत २० एकर इतका भूखंड देण्यात यावा. यासंदर्भात आम्ही लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.