Desh

अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर उभारा- सर्वोच्च न्यायालय

By PCB Author

November 09, 2019

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, मु्स्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचनादरम्यान दिली. या जागेत येत्या तीन महिन्यात मंदिर उभारण्याचे काम सुरू करावे असे सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत.