अयोध्येतील उध्दव ठाकरेंची सभा रद्द; केवळ साधू-संतांच्या भेटीगाठी घेणार

0
570

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २५  नोव्हेंबरला अयोध्येत होणाऱ्या सभेचा प्रशासनाला दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेत  उल्लेख  केलेला नाही.  त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर तसेच विंश्व हिंदु परिषदेच्या सभेच्या पार्श्वभूमीवर  ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हे २४ नोव्हेंबरला साधू- संताची भेट घेऊन शरयू नदीच्या महाआरतीत सहभागी घेतील. तसेच २५  नोव्हेंबरला राज मंदिर-मशिदीच्या पक्षकारांची भेट घेतील.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज ( मंगळवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी  शिवसेनेच्या कार्यक्रमादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.  संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी  सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.  अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे, हा सर्व ‍हिंदू संघटनांचा मुख्य उद्देश आहे, असेही ते म्हणाले.