अमोल पुंड, शिप्रा शेट्टी, उषा भालेराव ‘मिस्टर, मिस् आणि मिसेस् बेस्ट आयकॉन’ किताबाचे मानकरी

0
979

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – रूद्र इव्हेंट च्या वतीने ‘मिस्टर आणि मिसेस बेस्ट आयकॉन २०१८’ या स्पर्धेचा भव्य ग्रॅड फिनाले विमाननगर येथील हॉटेल ‘इलाईट सूटस्’ मध्ये नुकताच पार पडला. या स्पर्धत अमोल पुंड यांने ‘मिस्टर बेस्ट आयकॉन’ हा किताब पटकावला. तर ‘मिसेस बेस्ट आयकॉन’ची मानकरी शिप्रा शेट्टी ठरली. तर ‘मिसेस् बेस्ट ऑयकॉन’चा किताब उषा भालेराव यांनी पटकावला.

स्पर्धेतील इतर विजेते-

फर्स्ट रनरअप – पूजा पवार, सेंकड रनरअप ज्योती कांबळे, मिस् फोटोजेनिक ज्योती कांबळे, मिस् परफेक्ट प्रियांका मिसाळ,  मिस् पर्सनॅलिटी, बेस्ट फिटनेस क्वीन-शिल्पा मोरे, मिस् कॅटवॉक- सिध्दी गायकवाड, मिस् पर्सनॅलिटी मंजुषा ओव्हाळ

फर्स्ट रनरअप नवीन, सेंकड रनरअप- सोहम चाकणकर, मिस्टर फोटोजेनिक-राजेश राजीव, मिस्टर परफेक्ट योगेश नागर, मिस्टर पर्सनॅलिटी अमोल पुंड, बेस्ट फिजिक- नवीन, मिस्टर रॅम्पवॉक –विकी गावंडे,

मिसेस् विजेती – उषा भालेराव, फर्स्ट रनरअप स्मिता, सेंकड रनरअप प्राची महाडिक, मिसेस् परफेक्ट साक्षी काटकर या विजेत्यांना किताब देवून गौरविण्यात आले. विजेत्यांवर राजकीय, अभिनय, नाटक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, चेन्नई तसेच विविध ठिकाणहून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी मॉडेल, अक्टर, लेखक असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फ्रेशर स्पर्धकांसाठी ही स्पर्धा अधिक उत्तम ठरली. सर्व मॉडेल्सची कोरिओग्राफी माल्विका बारवे यांनी केली. स्पर्धेचे आयोजक सागर सोनवणे आणि जुनेद नायक यांनी केले.