Videsh

अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

By PCB Author

July 17, 2020

फ्लोरिडा, दि. १७ (पीसीबी) – कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात ६८ हजार ४२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३५ लाख ६० हजार ३६४ वर पोहोचली आहे. दरम्यान ९७४ मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार २०१ झाली आहे. एएफपीने ही माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत पहायला मिळत आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळत आहे. अमेरिकेतील काही राज्यांनी लॉकडाउन उठवण्यास सुरुवात केली असून त्याचाही परिणाम म्हणून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे.

अमेरिकेत फ्लोरिडा हे करोनाचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. फ्लोरिडामध्ये गुरुवारी १५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. फ्लोरिडामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ लाख १५ हजारांच्या पुढे गेली असून ४७८२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तुलनेत फ्लोरिडामध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली जात आहे. यानंतर कॅलिफोर्निया आणि टेक्सास यांचा क्रमांक असून दिवसाला १० हजार रुग्णांची नोंद होत आहे.

——