Videsh

अमेरिकेच्या रस्त्यांवर पडला पैशाचा पाऊस

By PCB Author

July 11, 2019

न्यूर्याक, दि, ११ (पीसीबी) – अमेरिकेत अटलांमध्ये एखादा चित्रपटा सारखाच सिन झाला आहे. पैसे घेऊन चाललेल्या  ट्रकचा अचानक पणे  दरवाजा  उघडला आणि रस्त्यावर पैसाच्या  पाऊस सुरु झाला.  रस्त्यावरनोटा दिसत असल्याने अनेकांनी गाड्या थांबत पैसे गोळा केले.  जवळपास १ लाख ७५ हजार डॉलर म्हणजेच सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाले असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील जॉर्जियाजवळच्या अटलांटामध्ये मंगळवारी एक ट्रक पैश्यांची वाहतूक करत होता.  दरम्यान अचानक ट्रकचा मागील दरवाजा उघडला आणि पैसे हवेत उडू लागले. बऱ्याच नोटा रस्त्यावरही पडल्या. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांनी हवेत आणि रस्यावर पैसे दिसल्याने गाडी थांबवत पैसे गोळा केला.

दरम्यान या संदर्भात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली असून, जवळपास १५ गाड्या रस्त्यावर थांबल्याचं म्हंटले आहे. जवळपास १ लाख  ७५  हजार डॉलर म्हणजेच सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.  विशेष म्हणजे पोलीस अधिकारी आणि ट्रकमधील कर्मचाऱ्यांनी अनेक नोटा  गोळा  केल्या.  पण अनेक नोटा  गायब  आहेत.