Videsh

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

By PCB Author

October 02, 2020

वॉशिंग्टन,दि.०२(पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.

Tonight, @FLOTUS and I tested positive for COVID-19. We will begin our quarantine and recovery process immediately. We will get through this TOGETHER!

— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.

Hope Hicks, who has been working so hard without even taking a small break, has just tested positive for Covid 19. Terrible! The First Lady and I are waiting for our test results. In the meantime, we will begin our quarantine process!

— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020

दरम्यान होप हिक्सला करोनाची बाधा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते. होप हिक्स करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या होप हिक्सला करोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. मेलेनिया आणि मी करोना चाचणी केली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.