Desh

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर

By PCB Author

February 24, 2020

अहमदाबाद, दि.२४ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (ता. २४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.

अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ तासाभरात अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत. अमेरिकेच्या ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 12:30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहे.

ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याने अहमदाबादमध्ये स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमच उदघाटन ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.