बशर असद यांच्या रासायनिक शस्त्रांचा नाश करण्यासाठी अमेरिकेने सीरियावर हल्ला केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकन सैन्याने आक्रमणाला सुरूवात केली आहे.

सीरियाची राजधानी दमास्कस येथे स्फोट करण्यात आले आहेत. या स्फोटांचे आवाज दूरपर्यंत ऐकायला येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. असद रासायनिक हल्ले बंद करत नाही, तोपर्यंत कारवाई सुरु राहील, असे सांगितले जात आहे.

अमेरिकेच्या या लष्करी कारवाईला इंग्लंड व फ्रान्स या देशाने पाठिंबा दिला आहे. गेल्या आठवड्यात सीरिया सरकारने विषारी वायू सोडून ६० निरपराध नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर सीरिया वर लष्करी करवाई करण्याचे संकेत अमेरिकेने दिले होते. आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.