Pimpri

अमेझॉन कंपनीच्या कामगाराचा प्रताप. कंपनीलाच….

By PCB Author

February 19, 2021

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करणा-या एका कामगाराने गोडाऊनमधून तीन लाख 76 हजार 157 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत टेल्को रोड, पिंपरी येथील सोर्टेशन सेंटरयेथे घडली.

सोमेश्वर दत्ता खरात (वय 22, रा. शिवाजीचौक, ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय एकनाथ पवार (वय 29, रा. नवी मुंबई) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेल्को रोड पिंपरी येथे एमआयडीसीचे सेंट्रल वेअर हाऊस आहे. त्यात अॅमेझॉन कंपनीचे गोडाऊन आहे. आरोपी सोमेश्वर त्या गोडाऊनमध्ये काम करत होता. त्याने ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021या कालावधीत गोडाऊनमधून तीन लाख 76 हजार 157 रुपये किमतीचे लॅपटॉप, कॉम्प्युटर, इतर साहित्य चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.