अमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार ?

0
465

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – अमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती   बंद होण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. ऑनलाइन व्यापार आणि सवलती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नवीन धोरण तयार करत आहे. या  मसुद्यावर  सध्या काम सुरू असून नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

नवीन ई-कॉमर्स धोरणाचा मसुदा सरकारने नुकताच  जाहीर केला  आहे.  या मसुद्यानुसार ई-कॉमर्सवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार कडक पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहेत. नागरिकांकडून सूचना आल्यानंतर या मसुद्यात बदल करून नवीन धोरणाचे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले जाणार आहे. झोमॅटो, स्विग्गी सारख्या अॅप्सलाही हे नवीन धोरण लागू होणार आहे.

या धोरणामुळे वस्तूंच्या मूळ किमतींवर वेबसाइट्सला मोठ्या सवलती देता येणार नाहीत. या सवलती कोणत्या आधारे दिल्या जातात. यावर सरकारची बारीक  नजर असणार आहे. ई-कॉमर्स नियंत्रित करण्यासाठी आणि गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी एका नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी शिफारसही या मसुद्यात करण्यात आली आहे.