Desh

अमृतसर रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश – मुख्यमंत्री अमरिंदर सिंह

By PCB Author

October 20, 2018

जयपूर, दि. २० (पीसीबी) – अमृतसर रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे  आदेश दिले आहेत. पुढील चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिली आहे.  पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे.  

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दुर्घटना अत्यंत दुखद  आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, असे ते म्हणाले.

रेल्वे दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ जण जखमी झाले आहेत. आम्ही लवकरात लवकर सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन होईल, यासाठी प्रयत्न करत आहोत. अद्याप ९ मृतदेहांची ओळख पटलेली नाही’, असे अमरिंदर सिंह यांनी सांगितले. जेव्हा अशाप्रकारची दुर्घटना होते. तेव्हा संपूर्ण प्रशासन त्यात सहभागी होते. आम्ही जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर आलो आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळ येथे उपस्थित आहे, असे त्यांनी सांगितले.