अमित शहा यांच्या जीवाला धोका; एएसएल सुरक्षा व्यवस्था तैनात

0
685

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जीवाला धोका असल्यामुळे गुप्तचर विभागाच्या सुचनेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा देण्यात येणार आहे.

या सुरक्षेअंतर्गत शहा यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करेल आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागणार आहे. सध्या एएसएलचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सुरक्षा करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांच्या सुरक्षेसंबंधी एक समीक्षा बैठक झाली होती. यामध्ये आयबीने त्यांना उच्च स्तरीय धोका असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा पुरवण्याची शिफारस केली. शहा यांना २४ तास सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात येईल. त्याचबरोबर ३० कमांडो प्रत्येक क्षणी त्यांच्या अवतीभोवती असतील. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेत राज्यातील स्थानिक पोलीसही असतील.