अमित शहा देवापेक्षा मोठे आहेत का? ममता बँनर्जींचा संतप्त सवाल

0
419

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) – कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांत झालेल्या तुफान राडेबाजीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी   भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. शहा यांच्या विरोधात आंदोल न करायला  ते देवापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

मंगळवारी काढण्यात आलेल्या अमित शहा यांच्या  रॅलीमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. या घटनेनंतर बॅनर्जी यांनी विद्यासागर कॉलेजमध्ये जात ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडफोड विरोधात रॅली काढण्याची घोषणा केली आहे.  विद्यासागर यांच्या प्रतिमेला हात लावल्याने पश्चिम बंगालच्या अस्मितेला धक्का लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, विद्यासागर यांचा पुतळा तोडणारे लोक भाजपचे केवळ मतदानासाठी आणलेले गुंड असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान, कोलकातामध्ये अमित शहा यांची मंगळवारी सभा होणार होती, सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले होते. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दुसरीकडे शहा यांची रॅलीसुरु झाल्यानंतर ट्रकवर काठ्या  आणि दगड भिरकावल्याने  गोंधळ उडाला. यावेळी तुफान दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली.