अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

0
335

नवी दिल्ली,दि.२५(पीसीबी) – दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हिंसाचार झाला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असतानाही राजधानी दिल्लीत हिंसाचार होतोच कसा? हे सर्वोतोपरी राज्याच्या गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्री अमित शहा यांना हे सांभाळणं जर जमत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ट्रम्प यांचा दौरा सुरु असताना दिल्लीत दंगल होतेच कशी? याचं स्पष्टीकरण अमित शहांनी देशाला द्यावं. गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी?, असा सवाल करत अमित शहांना हे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.