अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो – अशोक गेहलोत

0
212

जयपूर,दि.१(पीसीबी) – भाजपकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा आरोप वारंवार काँग्रेसचे नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून करण्यात येत आहे. याच पार्शवभूमीवर कर्नाटक, मध्यप्रदेश, मणीपूर किंवा गोव्यातील सरकार पाडण्यात नेहमी अमित शहांचं नाव आघाडीवर राहिलं आहे. यामुळे कदाचित मला नाईलाजास्तव म्हणावं लागतंय की अमितजी नक्की तुम्हाला झालंय तरी काय?, दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचाच विचार तुमच्या डोक्यात चालू असतो, अशा शब्दात गेहलोत यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे.

लोकांनी निवडून दिलेली सरकारं जर भाजप अनैतिक मार्गाने पाडत असेल. तर लोकशाही नावापुरती तरी राहिल का? पक्ष निवडून येतात तर कधी पडतात. सरकार बनतं तर कधी बनत नाही. मात्र लोकशाही नसेल तर देशाला धोका पोहचेल. असं म्हणत गेहलोत यांनी ट्विटरवरून अमित शहांवर टीका केली आहे.

दरम्यान, आपल्या सर्वांचं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी, न्यायालय, पत्रकार या सर्वांनीच लोकशाहीला वाचविण्यासाठी नेहमी पुढं यायला हवं, असं आवाहनही गेहलोत यांनी यावेळेस दिलं आहे.