Maharashtra

अमित शहांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे करणार दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शन

By PCB Author

October 02, 2019

बीड, दि. २ (पीसीबी) – भाजप नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त  बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंडे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.   

मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. यंदाही या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. या मेळाव्यात पंकजा मुंडे  काय बोलणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये परळी नगरपालिका आणि २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात  भावा बहिणीत  काटाजोड लढत पाहायला मिळणार आहे. दोन्हीही  जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.