अमित शहांचे एनडीएच्या नेत्यांना मंगळवारी भोजनाचे निमंत्रण      

0
492

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या  सातव्या आणि अखेरच्या  टप्प्यातील  मतदानानंतर रविवारी सायंकाळी प्रसिध्द झालेल्या  एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या  नेत्यांना  दिल्लीत मंगळवारी (दि.२१)   सहभोजनाचे आयोजन केले आहे. 

बहुतांश एक्झिट पोलनी भाजप प्रणित एनडीएचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भाजपच्या गोटात  आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटात   शांतता पसरली आहे.  एक्झिट पोलच्या अंदाजामुळे  विरोधकांमध्ये नाराजी पसरली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत आकडा गाठता येणार नाही.  त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. मात्र, विरोधकांचा  एक्झिट पोलच्या  अंदाजामुळे  भ्रमनिराश होण्याची शक्यता आहे. तर भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.