Maharashtra

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; प्रोफाईलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो

By PCB Author

June 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट सोमवारी (दि.१०) रात्री हॅक करण्यात आले होते. हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. सोबतच बायोमध्ये ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिले होते.

अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्टे शेअर करण्यात आल्या आहेत. तुर्कीच्या ‘टर्किश साइबर आर्मी ‘अयिल्दिज टीम’ने बिग बी यांचे ट्विटर हॅण्डल हॅक केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ यांचे ट्विटर हॅण्डल रिकव्हरही करण्यात आले. तसेच हॅकर्सनी केलेले सर्व ट्वीट डिलीट केले आहेत.