Maharashtra

अमिताभ बच्चन यांचेही सत्य लवकरच बाहेर येईल – सपना भवनानी

By PCB Author

October 13, 2018

मुंबई, दि.  १३ (पीसीबी) – ‘मी टू’ वादळाचा तडाखा बिग बी अमिताभ बच्चन यांना बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील, असे सूचक टि्वट हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी हिने केले आहे. कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे वर्तन व्हायला नको, असे मत मी टू मोहिमेबद्दल एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले होते. यानंतर भवनानी हिने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मी टू बाबतची पोस्ट अमिताभ यांनी लिहिली होती. ती शेअर करत भवनानी हिने लिहिले, ‘हे कदाचित जगातील सर्वात मोठे खोटे असेल. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेला आहे. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही अशीच संपणार आहे. तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल, असे भवनानी हिने म्हटले आहे.

दरम्यान, आधी लोकांना सपना भवनानी हीच शोषणाची बळी ठरली आहे. असे वाटत होते. पण त्याबाबतही तिने स्पष्ट केले की, मला अमिताभ यांचा कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. मात्र, त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी मी स्वत: ऐकल्या आहेत. या महिला पुढे येतील, अशी मला आशा आहे.