Pimpri

अमानुषतेचा कळस; हुंड्याचे पैसे आणि दागिन्यांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ

By PCB Author

March 30, 2021

पिंपरी, दि.३० (पीसीबी) – विवाहितेकडे हुंड्याचे पैसे आणि दागिन्यांची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश तुकाराम पवार (वय 30), शोभा तुकाराम पवार (वय 55), अनिल तुकाराम पवार (वय 34), अक्षरा अनिल पवार (वय 28, सर्व रा. तिलोरे, पो. विघवली, ता. माणगाव, जि. रायगड), लाटा सुरेश दंडवते (वय 40, रा. वाघोली, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 10 डिसेंबर 2017 ते 29 मार्च 2021 या कालावधीत तिलोरे येथे घडला. आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून हुंड्याचे पैसे व दागिने घेऊन येण्यास सांगितले. विवाहितेने पैसे व दागिने आणले नाहीत म्हणून तिला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन तिला उपाशी ठेवले. तिचा अपमान करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.