अमरावती शिवसेनेतला वाद उफाळला; नेत्यांना मातोश्रीवरुन बोलावणे

0
477

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. अमरावती शिवसेनेमधील वाद मिटणार की वाढणार हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेकडे अभिजीत अडसूळ यांनी ही तक्रार केली आहे. नवनीत कौर राणा यांचा विजय आणि आभार रॅलीमधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनीत राणांचा सत्कार केला होता, तसेच शुभेच्छाही दिल्या होत्या. या सगळ्याचे व्हिडिओ आणि फोटो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी मातोश्रीवर बेठक बोलावली आहे. या बेठकीला अनंतराव गुढे यांनाही तातडीने बोलवण्यात आले आहे.