Bhosari

अभ्यासासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

By PCB Author

January 27, 2021

भोसरी, दि.२७ (पीसीबी) : अभ्यासासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एकाने अश्लील चाळे केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री साडेआठ वाजता गवळीमाथा भोसरी येथे घडली.

अमितकुमार शिमला शाह (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या 28 वर्षीय नातेवाईक महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 12 वर्षीय भाची तिच्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या घरी शिकवणी व अभ्यासासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला बाजूला ओढून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलगी मोठ्याने ओरडली असता तिच्या पाठीत मारून कुणाला काही सांगू नको, असे म्हटले. ‘जर तू कुणाला सांगितले तर मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.