अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही- विनोद तावडे

0
455

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. यामुळे प्रवेश मिळणार की नाही याची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर होती.

विनोद तावडे यांनी सभागृहात घोषणा करताना अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री आणि प्रवेश नियंत्रण समिती यांच्या बैठकीत प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. परंतु विद्यार्थ्यांना वेळेत ही प्रमाणपत्रे मिळत नव्हती. यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी मिळालेला प्रवेश कायम होतो की नाही, अशी टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असायची. त्या संदर्भात विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने तक्रारी केल्या गेल्या.