अभिमानास्पद ,फौजदार बापाचा, DSP लेकीला ऑनड्युटी सॅल्युट

0
253

तिरुपती, दि. ४ (पीसीबी): आपल्याकडे वडील मुलगा, वडील- मुलगी राजकारणात कतृत्व गाजवताना दिसतात. मात्र,आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये अशाच स्वरुपाचा पण वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे राज्यातील पोलिसांचा प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त तिरुपती येथे आलेल्या सर्कल इन्सपेक्टर वाय श्याम सुंदर यांनी त्यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथी हिला सॅल्युट ठोकला. या प्रसंगामुळे वडील लेकीसह उपस्थित पोलीसही भावूक झाले. ही अनोखी घटना रविवारी घडली यामुळे वडील मुलगी भावनिक झालेले पाहायला मिळाले. दोघेही आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावत आहेत.
वडिलांच्य्या सॅल्युटला लेकीचाही सॅल्युट

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे 4 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान पोलिसांच्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस दलातील अधिकारी तिरुपती येथे जमले आहेत. वाय श्याम सुंदर यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथी सध्या गुंटूर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. श्याम सुंदर आणि जेस्सी प्रसांथी ड्युटीवर असताना प्रथम एकमेकांसमोर आले. यामुळे श्याम सुंदर यांनी त्यांच्या लेकीला सॅल्युट ठोकला. वडिलांनी सॅल्युट केल्यानंतर जेस्सी प्रसांथी यांनी इन्स्पेक्टर वडिलांना सॅल्युट केला.
जेस्सी प्रसांथी यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांनी सॅल्युट ठोकला त्यावेळी गोंधळल्यासारखं झाल्याचं सांगितले. जेस्सी प्रसाथी यांनी 2018 मध्ये पोलीस सेवा जॉईन केली आहे. 2018 पासून प्रथमच वडिल आणि मुलगी समोरासमोर आले. वडिलांना सॅल्युट करु नका, असं सांगूनही त्यांनी सॅल्युट केल्याचं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या.
माझे वडिलचं माझी प्रेरणा आहेत, असही जेस्सी प्रसांथी म्हणाल्या. वडिलांना पोलीस दलात काम करताना बघून वाढले, असं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या. पोलीस दलात काम करताना वडिलांनी अनेकांची मदत केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच पोलीस दलात सेवा करण्याचा निश्चय केला, असं जेस्सी प्रसांथी म्हणाल्या.