Maharashtra

अभिमानास्पद: नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी फ्रान्समध्ये जाऊन पटकवले ‘आयर्नमॅन’ किताब

By PCB Author

August 28, 2018

नाशिक, दि. २८ (पीसीबी) –  युरोप खंडातील अतिशय खडतर समजली जाणारी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पूर्ण करत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. फ्रान्समधील विचीमध्ये रविवारी (दि.२६) पार पडलेली ही स्पर्धा इंग्लंडच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपली.

आयर्नमॅन किताब पटकवण्यासाठी चार किलोमीटर स्विमिंग, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर सायकलिंग या सर्व स्पर्धा १६ तासांच्या कालावधीत पूर्ण करायच्या असतात. विशेष म्हणजे वयाच्या ५२ व्या वर्षीत डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केवळ १५ तास आणि १३ मिनिटांमध्येच हे टास्क पूर्ण करत अभिमानाने भारताचा तिरंगा फडकावला. रवींद्रकुमार सिंघल यांच्यावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून तीन सप्टेंबरला नाशिकमध्ये येताच त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.