अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात गुन्हा दाखल

0
341

काटघर, दि. १२ (पीसीबी) – स्टेज शोसाठी आयोजकांकडून २४ लाख रुपये घेऊन तो शो न केल्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.