Maharashtra

अभिनेत्री आलिया भट्ट “या” चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक

By PCB Author

April 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना बॉलिवूडही या प्रचारात सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार यंदा निवडणूक लढवताना दिसत असताना अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर ती कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवेल हेदेखील तिनं सांगितलं आहे.

कलंक चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता वरुण धवन ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी कपिलनं या तिघांनाही निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारला. ‘तुम्ही जर निवडणूक लढवली तर कोणत्या चिन्हावर लढवाल?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी आलिया म्हणाली, ‘मला थाळी या चिन्हावर निवडणूक लढवायला आवडेल. कारण राजकारणात ‘चमचे’ फार पाहिलेत पण थाळी अजून पाहिली नाहीए.’

आलियानं दिलेल्या या उत्तराचं सगळ्यांनी कौतुक केले. याच प्रश्नाचे उत्तर देताना, सोनाक्षी म्हणाली की माझ्या पक्षाचं चिन्ह ‘खामोश’ असं लिहिलेलं असेल. कारण माझा पक्ष जेव्हा असेल तेव्हा तो बोलणार कमी आणि नागरिकांच्या हिताची कामं जास्त करेल.