Maharashtra

अभिनेता संजय दत्त असा झाला कर्करोग मुक्त…

By PCB Author

October 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) : बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त यांने फुप्फुसाच्या कर्करोगावर मात केल्याचे कळते आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संजय दत्त पूर्णपणे बरा झाल्याची माहिती त्याच्या एका निकटवर्तीयाने दिली आहे.

यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने पीटीआयला ही माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा संजय दत्त आजारी आहे ही बातमी समोर आली तेव्हा सगळ्यानांच शॉक बसला होता. त्यातही त्याला कर्करोग झाल्याने तो आता केवळ सहा महिनेच जगणार असल्याच्या अफवादेखील पसरल्या होत्या. मात्र, या अफवांना बळी न पडता त्याच्या सगळ्या चाहत्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्या प्रार्थनांना यश आले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याने, तो या सगळ्यातून लवकर बाहेर पडला आहे.’