अभिनेता दलीप ताहिलने दारुच्या नशेत दिली ऑटोला धडक;  ऑटोचालकासह युवक आणि युवती जखमी

0
470

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अभिनेता दलीप ताहिलने दारूच्या नशेत स्वता: च्या कारने एका ऑटोला धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात ऑटोचालकासह युवक आणि युवती जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास घडली.

ऑटोला टक्कर दिल्यानंतर ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र रविवारी रात्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असल्याने त्यांना जास्त दूर जाता आले नाही आणि अपघातात जखमी झालेल्या युवक-युवतीने त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यानंतर ताहिल यांना कारमधून बाहेर पडण्यास सांगितले असता, त्यांनी आपल्याशी असभ्य वर्तवणुक केली, असा आरोपही युवक-युवतीने केला आहे. खार पोलिसांनी ताहिला यांना अटक केली होती. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.